मिशन नवोदय अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील 5,081 विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची सराव चाचणी संपन्न


AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे धाराशिव.

 
धाराशिव : जिल्हा परिषद धाराशिव, शिक्षण विभाग (प्राथमिक) आणि आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन नवोदय अंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या 5,081 विद्यार्थ्यांची सराव चाचणी आयोजित करण्यात आली.
विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, परीक्षेचे स्वरूप समजावे तसेच OMR (उत्तरपत्रिका) भरण्याचा सराव व्हावा, या प्रमुख उद्देशाने या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा बीट स्तरावर आयोजित करण्यात आली.
या सराव चाचणीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेप्रमाणे वेळेचे नियोजन करणे, प्रश्नपत्रिका सोडविणे, OMR उत्तरपत्रिकेवर अचूक माहिती भरणे आणि परीक्षेच्या पद्धतीची ओळख करून घेणे यांचा अनुभव मिळाला. आगामी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सदर सराव परीक्षा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महादळकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र खंदारे, डायटचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती एस. व्ही. कुंभार मॅडम आणि श्री राहुल चौधरी सर व श्री डी.यम.जंगम सर,यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण विभागातील अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमाच्या टीमने विशेष सहकार्य केले.

ग्रामीण भागातील प्रतिभावाने विद्यार्थीना तसेच जिल्हा परिषद शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशाची संधी मिळावी आणि त्यांची परीक्षेची तयारी अधिक प्रभावी व्हावी, हा या मिशन नवोदय उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.