तुळजापूरमध्ये चाकू हल्ला; दोघे गंभीर जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल



तुळजापूर : शहरातील बोंबले चौक परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चाकू हल्ल्याची गंभीर घटना घडली असून, यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हर्ष बालाजी सोनंजी (रा. खटकाळ गल्ली, तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याने दि. 22 मे 2026 रोजी बोंबले चौक येथे फिर्यादी मयुर बाळासाहेब पेंदे (वय 35, रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर) यांना मोटारसायकल बाजूला घेण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्यांनी व चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.
याच घटनेत पंकज विठ्ठल पेंदे यांनाही आरोपीने चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले.
या प्रकरणी फिर्यादी मयुर पेंदे यांनी दि. 23 मे 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 109, 115(2), 352 व 351(3) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.