धाराशिव, प्रतिनिधी : तालुक्यातील येडशी येथील करंडे गिफ्ट सेंटर व किराणा दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांकडून घटनेची माहिती घेत पीडित कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व पुनर्वसनासाठी सहकार्य मिळावे, अशी मागणी केली.
मध्यरात्री सुमारे दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या आगीत दुकान व घर जळून खाक झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. घरातील सात जणांपैकी केवळ २० वर्षीय तरुणाचा जीव वाचला. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांनाही प्राण गमवावे लागल्याचे समजल्याने डॉ. पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. “ही दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक असून, एका कुटुंबावर कोसळलेले संकट शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. घटनेची सखोल चौकशी करून पीडित कुटुंबाला तातडीने मदत मिळावी,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना डॉ. पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पीडित कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, आवश्यक मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.