नागरिकांच्या पाणीप्रश्नावर तातडीने उपाययोजना करा; निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही — आ. प्रविणजी स्वामी पंचायत समिती सभागृह, उमरगा येथे आमदारांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक पार पडली.
उमरगा: तालुक्यातील आव्हानात्मक टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी व पशुधनाला चारा-पाणी वेळेवर मिळणे हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. प्रशासनाने टँकरचे प्रस्ताव, विहीर अधिग्रहण आणि जलजीवन मिशनची कामे तात्काळ गतीने पूर्ण करून जनतेला दिलासा द्यावा, असे कडक निर्देश माननीय आमदार प्रविणजी स्वामी यांनी दिले.
आज, दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी पंचायत समिती सभागृह, उमरगा येथे आयोजित विशेष टंचाई आढावा बैठकीच्या अध्यक्षतेवरून ते बोलत होते. या बैठकीत आमदार स्वामी यांनी तालुक्यातील गावनिहाय पिण्याच्या पाण्याची टंचाई, टँकर मंजुरीचे प्रलंबित प्रस्ताव, चारा छावण्यांचे नियोजन आणि विहीर अधिगराची सद्यस्थिती याचा सविस्तर आढावा घेतला. तसेच 'जलजीवन मिशन'अंतर्गत अपूर्ण राहिलेल्या नळ पाणीपुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
"पाणीटंचाईच्या कामात कोणताही प्रशासकीय हलगर्जीपणा किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. टँकरचे प्रस्ताव विनाविलंब मंजूर करून शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे," असा स्पष्ट इशारा आमदार प्रविणजी स्वामी यांनी यावेळी दिला. या प्रसंगी सभापती आकांक्षाताई चौगुले, उपसभापती रेखा इंगळे, उपविभागीय अधिकारी श्री. दत्तू शेवाळे, तहसीलदार श्री. गोविंद येरमे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, उमरगा नगरपालिका मुख्याधिकारी (CO) श्री. चंदर बोदर, मुरूम नगरपरिषद मुख्याधिकारी (CO) श्री. भुजबळ, DySP श्री. सचिन रेखुळवाड, API श्रीकांत भराटे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर पाटील,राजेंद्र समाने,काँग्रेसचे सतिश जाधव, नगरसेवक विशाल कानेकर, प. स. सदस्य दगडू मोरे, तुकाराम जाधव, स्नेहा जाधव,महानंदा कलबुर्गे यांच्यासह महावितरण, जलसंपदा व पाणीपुरवठा विभागाचे सर्व वरिष्ठ अभियंता, स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान उपस्थितांनी मांडलेल्या स्थानिक समस्यांवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.