१० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत रिया शिंदेची दमदार कामगिरी; पटकावला प्रथम क्रमांक! पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या हस्ते अभिनंदन; शाळेत उत्साहात सत्कार
सोलापूर : इंडियन रनिंग सकाळ पेपर आणि सन्मित्र डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उळे येथील विद्यार्थिनी कु. रिया महेश शिंदे हिने १० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.
रिया हिच्या या यशाबद्दल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय कुंदन गावडे साहेब यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच शाळेत तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या वतीने तिला प्रोत्साहनपर ५०० रुपये रोख बक्षीस देण्यात आले.
या कौतुकास्पद कामगिरीबद्दल जिल्हा परिषद सदस्य नेताजी भाऊ खंडागळे, गटशिक्षणाधिकारी, सुतार मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी रियाचे अभिनंदन केले.
तसेच दक्षिण सोलापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मनोज बचुटे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांनीही तिचे कौतुक केले. रिया हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे शाळेसह उळे गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी स्पर्धांमध्येही तिने अशीच यशस्वी कामगिरी करावी, यासाठी सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.