धाराशिव एसटी प्रशासनाला दणका! उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासन हादरले; सर्व प्रमुख मागण्यांवर कारवाईचे लेखी आश्वासन


धाराशिव प्रतिनिधी:- रुपेश डोलारे.

 
धाराशिव एसटी बसस्थानकातील भ्रष्ट कारभार आणि प्रशासकीय अनागोंदीविरोधात पुकारण्यात आलेल्या बेमुदत आमरण उपोषणाच्या आक्रमक भूमिकेपुढे अखेर धाराशिव एसटी प्रशासन पूर्णपणे झुकले आहे. विभागीय नियंत्रकांनी उपोषणकर्त्यांना स्वतःच्या दालनात चर्चेसाठी बोलावून सर्व प्रमुख मागण्यांवर ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.  



दिनांक २७ ऑक्टोबर व ४ नोव्हेंबर रोजी दिलेल्या इशाऱ्यांनंतर ५ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय नियंत्रक कार्यालयात सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे श्री. विकास बनसोडे, आरपीआय (खरात) चे जिल्हाध्यक्ष श्री. राजाभाऊ राऊत आणि आरपीआय चे तालुका अध्यक्ष श्री. भालचंद्र कोठारे उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांच्या तीव्र आक्रमक पवित्राने प्रशासनाला नमण्यास भाग पाडले.  
 प्रशासनाने मान्य केलेल्या सर्व प्रमुख मागण्या:
एनसीएमसी (NCMC) कार्डवर दणका:
एनसीएमसी कार्ड संदर्भातील तक्रारींची दखल घेत परवानाधारक श्री. एस. एम. माळी यांचा आयडी (ID) तातडीने बंद करण्यात आला आहे.  
ठेकेदाराच्या मनमानीला आळा:
वाहनतळाकरिता नेमून दिलेल्या जागेवर अनधिकृत ताबा रोखण्यासाठी लोखंडी अँगल लावण्याबाबत परवानाधारक श्री. एस. एम. माळी यांना कळवून पुढील कडक कारवाई करण्यात येणार आहे.  
ऊस रसवंती गृहाची चौकशी व कारवाई:
बसस्थानक परिसरातील ऊस रसवंती गृहाच्या जागेबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  
प्रवाशांसाठी मोफत स्वच्छतागृह सुविधा:
उपाहारगृहाजवळील बंद असलेले स्वच्छतागृह तात्काळ सुरू करून प्रवाशांच्या माहितीसाठी 'सर्व प्रवाशांना मोफत स्वच्छतागृह उपलब्धते'बाबत ठळक फलक लावला जाईल.  
अस्तव्यस्त पार्किंगवर कडक कारवाई:
बसस्थानक परिसरात इतरत्र दुचाकी वाहने लावून होणारी कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाईल.  
प्रशासनाने ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत या सर्व मागण्यांवर टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत भ्रष्ट कारभारावर पूर्णपणे अंकुश न लागल्यास यापेक्षाही तीव्र आणि संघर्षमय आंदोलन छेडण्याचा इशारा श्री. विकास बनसोडे (वंचित बहुजन आघाडी), श्री. राजाभाऊ राऊत (जिल्हाध्यक्ष, आरपीआय-खरात) आणि श्री. भालचंद्र कोठारे (तालुका अध्यक्ष, आरपीआय) यांनी दिला आहे.