तुळजापूर तालुका | प्रतिनिधी तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळुंब्रा गावाकडे जाणाऱ्या हायवेजवळ २७ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. अरविंद बाळू मस्के (वय २७, रा. तरटगाव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळुंब्रा येथील विशाल वडणे याच्या पत्नीशी मृत अरविंद मस्के याचे कथित अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता माळुंब्रा गावाकडे जाणाऱ्या हायवेजवळ अरविंद मस्के याला मारहाण करून जिवे ठार मारल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मृताची आई रुक्मिणी बाळू मस्के (वय ४५, रा. तरटगाव, ता. उत्तर सोलापूर) यांनी २२ ऑगस्ट २०२६ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून विशाल वडणे व ओंकार वडणे (दोघे रा. माळुंब्रा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ११५(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा कलम ३(२)(व्ही), ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तामलवाडी पोलीस करीत आहेत.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.