आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी महिलांनी स्वयम् उद्योग सुरू करावा :- ॲड अरविंद बेडगे यशोधरा स्किल ॲकॅडमी व सुवर्णराज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवनकाम डिझायनिंग प्रशिक्षण उद्‌घाटन संपन्न

  


नळदुर्ग प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर.


महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नळदुर्ग येथे सुवर्णराज महिला मंडळ व यशोधरा स्किल ॲकॅडमी यांच्या वतीने मोफत फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण कोर्सचा उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला. यशोधरा स्किल अकॅडमीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला शहरातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी महिलांनी स्वयम् उद्योग सुरू करावा आसे प्रतिपादन ॲड अरविंद बेडगे यानी केले 
नळदुर्ग येथे नुकताच शिवनकाम
फॅशन डिजाईनिंग मोफत प्रशिक्षण शिबीर संपन्न करण्यात आले त्यावेळेत कार्यक्रमाचे प्रमुख
वक्ते म्हणून बोलत होते .
प्रथमता तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पुजनिय भन्ते गोविंदो यांनी सर्व उपस्थित मान्यवरांना 
त्रिशरण पंचशिल दिले 
यशोधरा स्किल ॲकॅडमी व सुवर्णराज महिला मंडळाच्या मुख्य प्रवर्तक तथा अध्यक्षा सुवर्णताई झाडे यांनी उपस्थित ॲड अरविंद बेडगे , नळदुर्ग नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका
साक्षीताई नळदुर्गकर , प्रशिक्षिका 
प्रमिलाताई चटगे , पल्लवीताई बनसोडे अदि मान्यवरांचे शाल फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला 
कौशल्याचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय सुरू करा, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा आणि आपल्या कुटुंबांच्या संसाराला हातभार लागावा शिवाय महिलांनी उद्योग धंद्याकडे मार्गक्रमण करावे घर बसल्या व्यवसाय व आर्थिक विकास साधण्या करिता महिलांनी स्वावलंबन झाले पाहिजे आसा प्रेरणादायी संदेश संस्थेच्या 
अध्यक्षा सुवर्णाताई झाडे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी महिलांना दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षणार्थी महिला पार्वती वाघमारे , मिरा थोरात, ज्योती बनसोडे, आदीने परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार तथा संपादक दादासाहेब बनसोडे यांनी मानले