महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश; देवकन्या गाडे यांच्यासह अनेक महिलांचा शिवसेनेत प्रवेश!

 


AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे धाराशिव.

 
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि लोकप्रिय खासदार ओमदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपच्या युवती मोर्चाच्या जिल्हा प्रभारी तथा माजी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस देवकन्या गाडे ताई यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी डॉ. जय राजेनिंबाळकर यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.



या पक्षप्रवेश सोहळ्यात मनिषा नन्नवरे, सीमा गायकवाड, अश्विनी यरवडकर, शीतल पेठे, छाया तोडकरी, साळू इंगळे, आकूबाई खंडागले, सोनाली चव्हाण, अस्मिता टाकपारे, शिंदु वाघमारे, साळुबाई शितोळे, संगीता वाघमारे, इंदूबाई वाघमारे, सुनीता वाघमारे, छाया वाघमारे, कांचन वाघमारे, रुपाबाई वाघमारे, कंपाबाई वाघमारे, रुक्मीण वाघमारे, टोळाबाई वाघमारे, उर्मिला वाघमारे, कविता वाघमारे, नंदिनी वाघमारे, मनीषा शिनगारे, नंदूबाई धावरे, माळाबाई धावारे आणि निना वाघमारे यांचा समावेश आहे.
यावेळी सोमनाथ गुरव, अमित उंबरे, राजाभाऊ पवार, ज्ञानदेव करवर, मनीषा वाघमारे, श्वेता दुरुगकर, विश्वजीत पाटील, सह्याद्री राजेनिंबाळकर, वैभव उंबरे आणि ॲड. राज राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेनेचे विचार आणि मा. एकनाथजी शिंदे साहेब व लोकप्रिय खासदार ओमदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना परिवारात सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
महिलांचे संघटन, सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कार्य करण्याच्या निर्धारातून शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होत असल्याचे यावेळी दिसून आले.
शिवसेना परिवारात नव्याने सहभागी झालेल्या सर्व महिला कार्यकर्त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!