तुळजापूर नगर परिषद कार्यालया मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी.

 तुळजापूर नगर परिषद कार्यालया मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी.



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती तुळजापूर नगर परिषद कार्यालया मध्ये साजरी करण्यात आली. यावेळी कार्यालय अधीक्षक श्री वैभव पाठक यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात नगरपालिकेने ऊभारलेल्या भव्य शामियानात प्रतिमापूजन श्री दत्ता साळुंके यांच्या शुभहस्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या लगतच्या प्रतिमेचे पूजन श्री.बापूसाहेब रोचकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर प्रसंगी श्री.सज्जन गायकवाड, श्री. अमर ताकमोगे श्री. खालील भाई सिद्दिकी,श्री.नागेश काळे श्री.सुनील पवार, श्री . दादा भांजी,श्री. विशाल लोंढे, श्री.संजय झाडपडे, श्री. अमोल ढाले, श्री.अण्णा पारधे,श्री. प्रताप पवार इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव