तुळजापूर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त,महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केले अभिवादन.

 तुळजापूर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त,महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केले अभिवादन.


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव


तुळजापूर:महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी तुळजापूर येथे महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठक संपन्न झाल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तुळजापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जाऊन अभिवादन केले, व उपस्थितांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्याम पवार,राहुल खपले,अर्जुन आप्पा साळुंखे,दिलीप नाना मगर, नवनाथ जगताप,सागर इंगळे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.