तुळजापूर तालुक्यातील काटी येथील, मानसी बनसोडे हिचे 12 वी परिक्षेत यश.

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील, मानसी बनसोडे हिचे 12 वी परिक्षेत यश.



प्रतिनिधी:- रुपेश डोलारे धाराशिव

काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मागासवर्गीय विद्यार्थीनी मानसी अनिल बनसोडे हिने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने

 फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी सायन्स परिक्षेत बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथील हेमुजी चंदेले कॉलेजमधून घवघवीत यश संपादन करीत 86.50 टक्के गुण मिळवून यश मिळविले.


या तिच्या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.