दिनांक 24.05.2024 रोजी येरमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक श्री. जाधव, पोलीस हावलदार/ 1368 प्रकाश चाफेकर, पोलीस नाईक/986 जमादार, असे पोलीस ठाणे येरमाळा हद्दीत रात्रगस्त पेट्रोलिंग करत असताना पोउपनि जाधव यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर जाणारे एनएच 52 रोडवर रत्नापूर पाटीजवळ अंदाजे 100 मीटर अंतरावर एक महिंद्रा कंपनीचा पांढरे रंगाचा पिकअप क्र एमएच 12 ईएफ 9813 व आयशर कंपनीचा टेम्पो क्र एमएच 42 एक्यु 8687 या दोन्ही वाहना मध्ये गोवंशीय जनावरे भरलेले महिंद्रा कंपनीचा पांढरे रंगाचा पिकअप व ईटकरी रंगाचे आयशर वाहने येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन येरमाळा पोलीस ठाण्याचे पथक हे मिळालेल्या बातमीवरुन लागलीच नमुद ठिकाणी जावून 00.30 वा. सु. अचानक छापा मारला. तसेच सदरील महिंद्रा कंपनीचा पांढरे रंगाचा पिकअप व आयशर टॅम्पोचे पथकाने निरीक्षण केले असता त्यामध्ये गोवंशीय जनावरे भरलेली दिसुन आली. सदरील वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव- इरफान नझीर कुरेशी, वय 43 वर्षे, रा. रसुलपुरा धाराशिव ता. जि. धाराशिव असे सागिंतले. तसेच महिंद्रा पिकअपचा चालक व किन्नर पळून गेले. नमुद महिंद्रा कंपनीचा पांढरे रंगाचा पिकअप व आयशर टॅम्पो मध्ये गोवंशीय जातीचे 22 वासरे, 3 जर्शी गाय व एक मयत जर्शी गाय वाहनासह असा एकुण 8,56,000 ₹ किंमतीचे जनावरे व वाहन मिळून आले. सदरील गोवंशीय जनावरांना वाहनांमध्ये दाटीवाटीने भरण्यात आले होते. या गोवंशीय जनावरांना गाडीमध्ये हालचाल करण्यासाठी पर्याप्त जागा नव्हती. अत्यंत त्रासदायक पध्दतीने दाटीवाटीने भरुन दोरीने आवळून वाहतुकीचा परवाना नसतानाही गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीरीत्या वाहतुक करताना मिळून आले. त्यावरुन पथकाने नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे येरमाळा पोठा येथे गुन्हा नोंदणी क्रमांक 142/2024 कलम 429 भा.दं.वि.सं. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5(अ),(1)(2),5(ब) प्राण्याच्या निर्दयतेने वागविण्यात प्रतिबंध कायदा कलम 3, 11(1)(डी)(एफ) (11)(के), 119 मपोका, 83, 177, 3(1), 181 मोवाका अन्वये गुन्हा नोदंवला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री क्षिरसागर, पोलीस उप निरीक्षक श्री. जाधव, पोलीस हावलदार- चाफेकर, पोलीस नाईक- जमादार यांचे पथकांनी केली आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.