डोळ्यांच्या विविध आजाराबाबत जनजागृतीची गरज - डॉ.ईस्माईल मुल्ला,
10 ते 16 जून डॉ.भालचंद्र दृष्टीदिन सप्ताह.
प्रतिनिधी:- रुपेश डोलारे धाराशिव
धाराशिव दि.10, शासकिय वैदयकिय महाविदयालयाचा नेत्र विभागाच्या वतीने आज डॉ.रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 10 जुन ते 16 जुन 2024 या कालावधीत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दृष्टीदिन सप्ताहाचे उद़घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला होते.यावेळी शासकिय वैदयकिय महाविदयालयाचे वैदयकिय अधिक्षक डॉ.तानाजी लाकाळ,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.आर.के.अन्सारी, नेत्रशल्यचिकित्सक डॉ.मुस्तफा पल्ला,डॉ.महेश पाटिल,डॉ ज्योति कानडे तसेच अधिसेविका श्रीमती सुमित्रा गोरे,नेत्रचिकित्सा अधिकारी श्री.बाळासाहेब घाडगे,श्री.रामराजे बिडवे,श्री श्रीकांत कल्याणी,शासकिय वैदयकिय महाविदयालायातील विविध विभागाच्या सर्व वॉर्ड इन्चार्ज व अधिपरीचारिका,नेत्रविभागाच्या वॉर्ड इन्चार्ज श्रीमती वहिदा शेख,सर्व नेत्रविभागातील अधिपरिचारिका तसेच रुग्ण कल्याण समिती सदस्य श्री अब्दुल लतीफ,श्री रौफ शेख,श्री गणेश वाघमारे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नेत्रशल्यचिकित्सक डॉ.महेश पाटिल यांनी दृष्टीदिनाचे महत्व सांगुन मरणोत्तर नेत्रदानाबाबत माहिती देऊन सर्वांना नेत्रदानाचे संमतीपत्र भरुन देण्याबाबत आवाहन केले.तसेच नेत्रशल्यचिकित्सक डॉ.ज्योती कानडे यांनी डॉ.भालचंद्र यांचे सामाजिक भावनेतुन व कुठलीही आधुनिक सोई सुविधा नसताना अंधत्व निर्मुलनाचे कार्य करुन हजारो लोकांना दृष्टी प्राप्त करुन देऊन त्यांच्या दृष्टीदानाच्या कार्याला उजाळा दिला.डोळयाच्या विविध आजाराबाबत माहिती देऊन डोळयाची काळजी घेण्याबाबतचे आवाहन केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुल्ला यांनी उपस्थित सर्वांना नेत्रदान, अवयवदान,देहदान,रक्तदान करण्याचे आवाहन केले.डोळयाचे विविध आजाराबाबत माहिती देऊन वेळोवेळी तज्ञ डॉक्टरामार्फत वेळेत तपासणी करुन घ्यावी, जेणेकरुन येणारे अंधत्व टाळता येऊ शकेल तसेच नेत्र विभागामार्फत करण्यात येत असलेल्या मोतिबिंदु शस्त्रक्रिया कार्याचे कौतुक केले.येणा-या कालावधीमध्ये डॉ.राम लक्ष्मण भालचंद्र यांनी केलेल्या कामाचा आदर्श डोळयासमोर ठेवुन जास्तीत जास्त मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्याबाबत आवाहन केले.
नेत्रविभागामार्फत करण्यात उत्कृष्ट कामाबददल रुग्ण कल्याण समितीकडून अधिकारी व कर्मचारी यांचा डॉ.ईस्माईल मुल्ला यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असताना उत्सफुर्तपणे रक्तदान केलेल्या कर्मचा-याचा यावेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन श्रीमती सुवर्णा देशमुख यांनी केले. उपस्थितांचे आभार रुग्ण कल्याण समिती सदस्य श्री रौफ शेख यांनी केले.यशस्वीतेसाठी नेत्रविभागातील सर्व अधिकारी,नर्सिंग स्टॉफ व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.