ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विजयात ठरले आ.कैलास पाटील किंग मेकर!
प्रतिनिधी:- रुपेश डोलारे धाराशिव
धाराशिव लोकसभा मतदारसंघातून सलग दुसर्यांदा विजयी झालेले लोकप्रिय खासदार ओमप्रकाश (दादा) राजेनिंबाळकर यांच्या देदिप्यमान यशामध्ये धाराशिव-कळंब लोकसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख कैलास (दादा) पाटील यांचा मोलाचा वाटा आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी एकमेव धाराशिव-कळंब विधानसभा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे आ.कैलास (दादा) पाटील यांनी खिंड लढवून लोकसभेत ओमप्रकाश (दादा) राजेनिंबाळकर यांना पुन्हा लोकसभेत संधी दिली. त्यामुळे आ.कैलास (दादा) पाटील हेच किंगमेकर ठरल्याचे बॅनर धाराशिव शहरात झळकत आहेत.
धाराशिव शहरातील महात्मा बसवेश्वर चौक, छत्रपती शाहुनगर, अष्टविनायक चौक व इतर भागात किंगमेकर कैलास (दादा) पाटील अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर संघटक प्रशांत (बापू) साळुंके म्हणाले की, धाराशिव लोकसभा मतदारसंघात बार्शी, परंडा-भूम-वाशी, तुळजापूर, उमरगा, औसा या विधानसभा मतदारसंघातील आमदार हे महायुतीत आहेत, आणि धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास (दादा) पाटील हे एकमेव आमदार आहेत. त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघाची खिंड लढवून विरोधी उमेदवारांना गारद केले. म्हणून कैलास (दादा) पाटील हेच या लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरल्याची प्रतिक्रिया श्री.साळुंके यांनी दिली.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.