सोलापुरात वीज पडून दोघांचा मृत्यू; शेळ्याही दगावल्या; तर एकजण जखमी.
प्रतिनिधी :- रुपेश डोलारे सोलापूर
दि.८, सोलापूर : सोलापुरात शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे जोरदार पाऊस पडला. विजेच्या कडकडाटासह हा पाऊस होता. शहराच्या जवळील वेगवेगळ्या गावामध्ये वीज कोसळल्याच्या घटना घडल्या असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर १ व्यक्ती जखमी, तसेच २ शेळ्याही दगावल्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुर्देहळ्ळी गावात वीज कोसळ्याने अमसिद्ध गायकवाड वय ६७ यांचा मृत्यू झाला तसेच गायकवाड यांच्या २ शेळ्याही दगावल्या आहेत. कुंभारी गावात शारदा सुतमील जवळ ‘बिळेणी डक्के’ पुजारी या ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू वीज पडल्यानेच झाला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलला पाठवल्याची पोलिसांकडून माहिती मिळाली. तर दोड्डी गावात वीज कोसळल्याने शंकर तुळशीराम राठोड हे ६९ वर्षीय वृद्ध व्यक्ती जखमी झाले आहेत. जखमी शंकर राठोड यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.