मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण,पात्र महिलांनी लाभ घ्यावा,- जिल्हाधिकारी सचिन ओंम्बासे.
प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव
धाराशिव दि 02,महिलांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी तसेच महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी राज्य सरकारने “ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ” ही योजना सुरु केली आहे.या योजनेच्या लाभासाठी 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित,विधवा, घटस्फोटीता,परित्यकत्या आणि निराधार महिला पात्र असतील.पात्र महिलेच्या आधारलिंक बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जाणार आहे.
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळण्यासाठी योजनेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.1 जुलै 2024 रोजी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.15 जुलै रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.16 जुलै रोजी तात्पुरती यादी प्रकाशित करण्यात येईल.16 जुलै ते 20 जुलै या कालावधीत तात्पुरत्या यादीवरील तक्रार/हरकती प्राप्त करण्याचा कालावधी असेल.21 जुलै ते 30 जुलै या दरम्यान तक्रार / हरकतीचे निराकरण करण्यात येईल. 1 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम यादी प्रकाशित करण्यात येईल.10 ऑगस्ट रोजी लाभार्थ्याने बँकेमध्ये ई-केवायसी करावी.14 ऑगस्ट रोजी लाभार्थी निधी हस्तांरण करण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत 1500 रुपये रक्कम लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा होईल.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी महिला राज्याची रहिवासी असावी.विवाहित,विधवा,घटस्फोटीत,परित्यक्त्या व निराधार महिला असावी.वय 21 वर्ष पूर्ण झालेल्या व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभ देण्यात येईल.लाभार्थीचे बँक खाते,आधार संलग्न असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लक्ष 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे 5 एकरपर्यंतच शेत जमीन असावी. कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ट्रॅक्टर वगळुन चार चाकी वाहन नसावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा.लाभार्थ्याचे आधारकार्ड असावे.सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला हा 2 लक्ष 50 हजार रुपयांच्या आतील असावा.बँक खाते पुस्तकाच्या पहिल्या पानाची छायांचित प्रत आदी कागदपत्रे ऑनलाईन अर्ज दाखल करतेवेळी सोबत जोडावी.ऑनलाईन अर्ज अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्य सेविका / सेतु सुविधा केंद्र/वार्ड अधिकारी/बाल विकास प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती येथे दाखल करावा.अर्जदार हे पोर्टलवर किंवा नारीशक्ती ॲपरवर स्वत: अर्ज करु शकतात.
तरी जिल्हयातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सखी वन स्टॉप सेंटरच्या (02422) 295272 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,धाराशिव यांनी कळविले आहे
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.