स्थानिक गुन्हे शाखा- दि.24.07.2024 रोजी 12.30 वा. सु. ते 03.30 वा.सु. अंजनसोंडा शिवारातील शेत गट नं 108 मधील उत्तम एंटर प्रायझेस कंपनीचे आर ई 04 पॉईटवरील टॉवरवर उत्तम एंटरप्रायझेस कंपनीचे आर ई 04 पॉइंटवरील टॉवरमधील कॉपर चे तारा अंदाजे 50,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेश महादेव माळी, वय 23 वर्षे, रा. अंजनसोंडा ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.24.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे गुरनं 208/2024 भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व तांत्रिक विश्लेषनावरुन पारा पारधी पिढी, ता. वाशी येथील- तानाजी उर्फ चिक्या आसाराम काळे, वय 26 वर्षे, अंजनसोंडा ता. वाशी येथील- जिवन उर्फ दत्तात्रय अच्युत क्षिरसागर, वय 31 वर्षे, भोगजी ता. कळंब जि. धाराशिव येथील- आकाश विष्णु खराटे, सारोळा मांडवा ता. वाशी जि. धाराशिव येथील- उत्तरेश्वर महादेव दराडे, वय 30 वर्षे यासह गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही दिवसात नमुद ठिकाणाहून ताब्यात घेउन त्यांच्या कडे गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता नमुद आरोपींनी आम्ही व आमचे अन्य साथीदारांनी केबल वायर चोरी केल्याची कबुली दिली. यावरुन पथकाने नमुद आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले बोलेरो पिकअप व मोबाईल फोन जप्त करुन पुढील कार्यवाहिस्तव नमूद आरोपींना वाशी पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ/ 504 वलीउल्ला काझी, पोह/ 576शौकत पठाण, पोह/929 प्रकाश औताडे पोह/ 289 जावेद काझी, पोह/1275 फरहान पठाण, यांच्या पथकाने केली आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.