खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्ये शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांनी बसून केला निषेध व्यक्त.

 


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

बस स्टॅन्ड मध्ये खड्डे पडले आहेत , पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचत, चिखल होतो ,नागरिकांना चालता ही येत नाही, अशी बिकट अवस्था निर्माण झालेली आहे, तरी सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही खरंतर हे दुर्दैव आहे, खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्ये अण्णासाहेब दराडे यांनी बसून निषेध व्यक्त केला,देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा सर्वसामान्य नागरिक अजूनही खड्ड्यातूनच वाटचाल करत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.



 आमदार खासदार मंत्री यांच्या घराभोवती असे खड्डे असतील का असं प्रश्न विचारत त्यांनी महाराष्ट्र मध्ये कित्येक बस स्टँड आजही दुरुस्तीला आलेले आहेत, आणि सर्वसामान्य नागरिकांना तो त्रास सहन करावा लागतो, सर्वसामान्य नागरिकांचे जगणं असं का? असा प्रश्न शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांनी पडला आहे.