तुळजापूर शहरातील गौरी गणपती आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न.

 


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी तथा पत्रकार संघ यांच्या वतीने तुळजापूर शहरातील गौरी गणपती मोहत्सवामध्ये शहरातील गौरी गणपती सुंदर देखावा स्पर्धा आयोजीत केली होती,त्यामध्ये शहरातील ५० हुन अधिक गौरी गणपती देखाव्यांना प्रमाणपत्र,बक्षीस देण्यात आली.


तुळजापूर शहरातील भगींनींच्या गौरी गणपती देखाव्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम माजी.नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या संकल्पनेतुन तथा पत्रकार यांच्या वतीने पुजारी मंडळ मंगल कार्यालय येथे घेण्यात आला, सदरील कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी,पुजारी मंडळ माजी अध्यक्ष किशोर गंगणे,माझी नगराध्यक्ष गणेश कदम,शहाजी भांजी,सौ पल्लवी सचिन रोचकरी,सौ कविता गणेश कदम,सौ मिनाक्षी संभाजी भांजी शहरातील महीला वर्ग,शहरातील पुजारी बांधव,युवा पुजारी,पत्रकार बांधव कार्यक्रमास उपस्थित होते.