मराठवाडा जिल्हा परिवर्तन मॉडेल अंतर्गत स्वयं शिक्षण प्रयोग व हिंदुस्थान युनिलिव्हर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने विजयलक्ष्मी सखी प्रोड्युसर कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

दिनांक 24. 9. 2024 रोजी मराठवाडा जिल्हा परिवर्तन मॉडेल अंतर्गत स्वयं शिक्षण प्रयोग व हिंदुस्थान युनिलिव्हर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने विजयलक्ष्मी सखी प्रोड्युसर कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेस नसीम शेख स्वयं शिक्षण प्रयोग, सौ. मरवाळीकर कृषी विज्ञान केंद्र, श्री गणेश चादरे टाटा इन्सटिट्यूट, शितल गुंड ॲक्सिस बँक, कंपनीच्या सी. ई.ओ. गोदावरी क्षीरसागर व चेअरमन अर्चना भोसले तसेच डायरेक्टर वैशाली शिंदे, वैशाली घुगे, सुरेखा कानडे, कल्पना कदम यांनी मार्गदर्शन केले. 

नसीम शेख यांनी कंपनी सभासदांना सोयाबीन खरेदी विक्रीसाठी प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले तसेच शेतीसाठी लागणारे बी-बियाणे तसेच साहित्य कंपनीमार्फत खरेदीसाठी आवाहन केले. डायरेक्टर सुरेखा कानडे यांनी कंपनीची प्रस्तावना केली व अर्चना भोसले यांनी कंपनीची उलाढाल यावर भाष्य केले तसेच कंपनीमार्फत सोयाबीन खरेदी विक्री करावी यासाठी आवाहन करण्यात आले व कंपनी डिसेंबर पासून सुरू करणार असलेला नवीन व्यवसाय पशुखाद्य विक्री याबद्दल चर्चा करण्यात आली. कंपनीचे सभासद पल्लवी जामगावकर यांनी सभासद व त्यांना होणारे फायदे याबद्दल त्यांचे मत व्यक्त केले व कंपनीने अशाच प्रकारे सभासदांना सहकार्य करावे अशी भावना व्यक्त केली. वैशाली घुगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच वैशाली शिंदे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.