उपोषण चिरडून सातलिंग स्वामी यांना रात्री धोका करण्याचा कट...! उपोषण स्थळी सकाळी अज्ञाताकडून करण्यात आला पाण्याचा चिखल.. रझाकारांच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाला, मात्र नाकर्ते पुढारी व कमिशनखोर, कामचुकार अधिकाऱ्यांच्या विळख्यातून उमरगा लोहारा तालुका केव्हा मुक्त होणार...?--सातलिंग स्वामी


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

उमरगा व लोहारा शहरासह तालुक्यामधील शेतकरी व अन्य नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याचे निवेदन उपविभागीय दंडाधिकारी गणेश पवार व पोलीस उपाधीक्षक सदाशिव शेलार यांना सातलिंग स्वामी यांनी दिल्यावरून सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरगा येथील उपविभागीय अभियंता सं. शि. मंडगे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी जाधवर यांनी संयुक्तपणे उपोषण स्थळी स्वामी व समर्थकांची भेट घेऊन आपल्या मागण्या आम्ही येत्या 30 सप्टेंबर 2024 पर्यंत नक्कीच सोडवू असे लेखी पत्र स्वामी यांना दिले. मात्र सदर पत्रातील काही दुरुस्त्या सुचवून सुधारित पत्र उपविभागीय दंडाधिकारी यांच्या समक्ष घेणार त्यामुळे साहेबांना घेऊन या अशी सूचना स्वामी यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यावरून त्यांनी होकारार्थी कबुली देऊन गेले. मात्र कदाचित कोणाच्यातरी सांगण्यावरून सदर पत्र घेऊन रात्री 8:00 पर्यंतही उपोषण सोडवण्यासाठी आलेच नाहीत. त्यामुळे स्वामी यांच्या समर्थकांचा संताप वाढून समर्थक आक्रमक झाले. मात्र स्वामी यांनी समर्थकांना संयम बाळगण्याची सूचना केल्यावरून समर्थक शांत झाले. स्वामी यांचे उपोषण रात्रभर चालूच ठेवायचे व त्यांना धोका करायचा असा कट होता का ? असा कयास केला जात आहे.

तत्पूर्वी सकाळी साडेनऊ वाजता सातलिंग स्वामी व त्यांचे समर्थक उपोषण स्थळी पोहोचले असता तेथील मंडपात अज्ञाताकडून जाणूनबुजून पाणी सोडून चिखल करण्यात आला होता जेणेकरून उपोषण उधळून लावावा असा कुटिल प्रयत्न झाला असल्याचे दिसून आले. मात्र असे असले तरी सातलिंग स्वामी आपल्या उपोषणावर ठाम होते. त्यांनी आपल्या समर्थकांसह उपोषण स्थळी बैठक मारलीच. सातलिंग स्वामी यांच्या उपोषणामुळे कांही सत्ताधाऱ्यांना अडचण वाटत असल्याने कि काय उपोषण स्थळाच्या परिसरात त्यांचे हेर नव्हे चमचे मंडपाभोवती घिरटया घालून आपल्या मालकाला उपोषणाची इत्यंभूत माहिती पुरवत होते हे सातलिंग स्वामी यांच्या चाणाक्ष समर्थकांनी हेरले व पूर्वीच सावध असलेल्या समर्थकांनी आणखी सतर्क होऊन स्वामी साहेबांभोवती सुरक्षा कवच करून उपोषण संपेपर्यंत आजूबाजूला करडी नजर ठेवून सुरक्षा पुरवत होते. 

तदनंतर रात्री दहा वाजता उपविभागीय दंडाधिकारी गणेश पवार उपोषणस्थळी येऊन त्यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, नगरपरिषदचे मुख्याधिकारी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांना उपोषणस्थळी येऊन गणेश पवार यांच्या साक्षीने दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण करू असे लेखी देऊन रात्री साडेदहा वाजता उपोषणाची सांगता करण्यात आली.

प्रारंभी उपोषणास बसल्यानंतर सकाळी दहा वाजता मराठवाडा मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले त्यांना सातलिंग स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरद पवार गटाचे ) उमरगा तालुकाध्यक्ष संजय पवार, संभाजी ब्रिगेडचे उमरगा तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पवार, दिव्यांग प्रहार संघटनेचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष इसाक शेख, भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटना धाराशीव जिल्हाध्यक्ष निर्मला सुरवसे, व अन्य बहुसंख्य समर्थकांनी अभिवादन केले.


उपोषणास पाठिंबा देण्यासाठी उमरगा शहरासह येळी, जकेकूर, माडज, केसरजवळगा, नारंगवाडी, मुरूम, मुळज, त्रिकोळी, मातोळा, होळी, एकोंडी ( लो ), कवठा, डाळिंब, भुसणी, आचलेर, आलूर, बेळंब, कंटेकुर, आष्टा कासार, भोसगा, दस्तापुर, विलासपूर पांढरी, जेवळी ( द ), जेवळी ( उ ), लोहारा, नागूर, कास्ती, कानेगाव, तोरंबा, होळी, हराळी, तावशी, सालेगाव, कलदेव निंबाळा, वडगाव ( गां ), वरनाळवाडी, दाबका, तुरोरी, तलमोड, कोराळ, कुन्हाळी, गुगळगाव, वागदरी, एकुरगा, सावळसुर, बाबळसुर, कोरेगाव, पेठसांगवी, माकणी, सास्तुर, तुगाव, शिवाजीनगर तांडा, रामपूर, बलसूर, नाईकनगर आदी ठिकाणाहून विविध राजकीय पक्षाचे त्यातच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे इतकेच नव्हे सत्ताधारी महायुती मधीलही काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन पाठिंबा दिला. दिव्यांग बांधव, अॅड. शितल चव्हाण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. शीतल चव्हाण यांचे पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा असल्याबाबत पत्र दिले. तसेच युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड, प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरगा तालुकाध्यक्ष अजिम खजुरे, व्यापारी महासंघाचे उमरगा तालुका अध्यक्ष रणधीर पवार, माता सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा पंचशीला कांबळे, मराठा समाजाचे पत्रकार दिनेश पाटील, नेताजी गायकवाड, केसरजवळगा येथील दिव्यांग बांधव पंडित जळकोटे, सिद्धेश्वर गायकवाड, सौ. कलावती गायकवाड, 

प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी संघटनेचे माजी उमरगा तालुकाध्यक्ष नागराज मसरे, वीरभद्र स्वामी, अजितसिंह गहेरवार, शेतकरी संघटनेचे उमरगा तालुका अध्यक्ष महेश्वर गव्हाणे आदिंसह उमरगा लोहारा तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.