श्री बालाजी प्रभाकर मुळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सिंदफळकर सरांच्या वतीने सत्कार


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

    रामवरदायनी प्राथमिक विद्यामंदिर शुक्रवार पेठ तुळजापूर या शाळेतील माझे मित्र व सहकारी सहशिक्षक श्री बालाजी प्रभाकर मुळे राम वर्धनी शाळेची धडाडी तोफ यांना सन 2024 25 मधील आदर्श शिक्षक पुरस्कार रोटरी क्लब तुळजापूर यांच्यातर्फे काल दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी तुळजापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री प्रशांत मेसे अपराध व समस्त रोटरी क्लब तर्फे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन श्री मुळे सरांचं सत्कार करण्यात आला आहे 

       त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री मधुकर शेटे सर व मुख्याध्यापिका श्रीमती शिवणे मॅडम तसेच सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे मुळे सरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.