राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांची (दि.26 ) मुंबई येथे प्रदेश कार्यालयात जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी भेट घेऊन जिल्ह्यातील पक्षासाठी एक तरी विधानसभा मतदारसंघ सोडून घेण्यासाठी भेट घेतली व पक्षश्रेष्ठीं समोर आपला 15 महिन्यांचे एकत्रित 15 कार्य अहवाल सादर केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असून धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील एक तरी जागा पक्षासाठी सोडवून घ्यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष यांनी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष मा.खा.सुनील तटकरे साहेब यांच्याकडे केली. धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पक्षाचा मोठा जनाधार असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जोडले गेले आहेत व पक्षाची ताकद ही मोठी आहे.
धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पक्षासाठी एक तरी जागा मिळाल्यानंतर महायुती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्रिय राहील व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना तसेच पक्षाला जिल्हामध्ये बळ मिळेल.त्याचप्रमाणे तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढविण्यासाठी माझी जोरदार तयारी असून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे असे यावेळी सविस्तर चर्चेदरम्यान सांगण्यात आले. अजित दादा यांच्या वतीने असे सांगण्यात आले की आम्ही या जागेसाठी प्रयत्नशील असून एक तरी जागा नक्की सोडवून घेऊ असे यावेळी जिल्हाध्यक्ष यांना आश्वासन देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष पद घेताना अजित दादा यांनी जिल्हाध्यक्ष यांना केलेल्या सूचनेप्रमाणे प्रत्येक महिन्याचा कार्य अहवाल पक्ष कार्यालयाकडे सादर करावा त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी 15 महिन्याचे मिळून एकत्रित असे एकूण 15 अहवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष मा.खा.सुनील तटकरे साहेब, विधान परिषद सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे व पार्थ दादा पवार यांच्या समोर सादर केला. व जिल्ह्यातील चालू घडामोडी बद्दल सविस्तर अशी चर्चा केली.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.