बापूसाहेब अडसुळ यांची पुणे बोर्डाच्या संचालक पदी निवड...

 


प्रतिनीधी रुपेश डोलारे धाराशिव

महाराष्ट्र राज्य मंत्रालय समन्वय समिती सदस्य बापूसाहेब अडसूळ सर यांची पुणे बोर्ड संचालक पदी निवड झाली.त्यानिमित्त त्यांची तुळजापूर येथे सदिच्छा भेट झाली. त्यावेळी स्वाभिमानी शिक्षक संघटना धाराशिव यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी म्हेत्रे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी व्हनकडे सर, सोलापूर जिल्हाध्यक्ष भाग्यवंत सर, वाहिद सय्यद व संघटनेचे तुळजापुरातील इतर सदस्य उपस्थित होते.