८५ वर्षांवरील वृद्ध अन Pwd मतदार घरातून करणार मतदान..... ९ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर कालावधीत घेणार मतदान - निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार डव्हळे


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव


  लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेले व PWD मतदार घरी राहून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बीएलओ यांनी गृहभेटी दरम्यान 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या 583  व 93 PWD मतदारानी घरातुन मतदानाचा पर्याय निवडला आहे. अशा एकूण 676 मतदारांचे मतदान ९ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.

          याची पूर्व कल्पना दि.05/11/2024 रोजी घेतलेल्या उमेदवार यांच्या बैठकीमध्ये देण्यात आली. तसेच आज दि.08/11/2024 रोजी बैठक घेऊन सर्व उमेदवारांना याची माहिती देण्यात आली. 

           यासाठी ३० पथक नियुक्ती कऱण्यात आले आहेत. या पथकात १ क्षेत्रिय अधिकारी, २ सहाय्यक मतदान कर्मचारी,सूक्ष्म निरीक्षक आणि एक पोलिस कर्मचारीयांचा समावेश आहे. सदरील पथक हे ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक मतदार जिथे रहात असेल तिथे त्यांची पडताळणी करुन त्यांना मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.

   तरी पुनश्च: सर्व राजकीय पक्ष, उमेदवार  व मतदार यांना आवाहन करण्यात येते की, सदरील प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन मतदान सुरळीत पार पडेल याची काळजी घ्यावी अशी माहिती श्री.संजयकुमार डव्हळे, निवडणूक निर्णय अधिकारी, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी धाराशिव यांनी दिली.



        (संजयकुमार डव्हळे) 

   निवडणूक निर्णय अधिकारी, 241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघ.