महामार्ग पोलीस केंद्र नळदुर्ग अंतर्गत तामलवाडी टोल येथे वाहतूक नियम संदर्भात जनजागृती.


संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव

तामलवाडी:- राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 च्या अनुषंगाने महामार्ग पोलीस केंद्र नळदुर्ग अंतर्गत NH 52 तामलवाडी टोल येथे  महामार्गावरुन येणारे जाणारे वाहन चालक यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रभारी अधिकारी म.पो.केंद्र नळदुर्ग श्रीमती अमृता पटाईत यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. महामार्ग पोलीस संदीप सुरवसे, अमोल बनसोडे, उद्धव टोपे, अजित गायकवाड, या सर्वांनी वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शन केले.

  आपला जीव अनमोल असल्याने मोटार सायकल चालवितांना नेहमी हेल्मेट चा वापर करणे गरजेचे आहे. वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर टाळणे गरजेचे असून अत्यावश्यक फोन असल्यास आपली गाडी रस्त्याच्या कडेला घेवून बोलणे गरजेचे आहे. मोटार सायकल वर ट्रिपल सिट प्रवास हा कायद्याने गुन्हा आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास अपघात होवू शकतो. त्यामुळे आपला व समोरच्या व्यक्तीच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे कौटुंबिक, आर्थिक व समाजीक प्रश्न निर्माण होवू शकतात. त्यामुळे योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे. ओव्हरटेक करतांना समोरील रोडवरून वाहन येत नसल्याची खात्री करून उजव्या बाजूने ओव्हरटेक करणे गरजेचे आहे. वाहन चालविताना वेग मर्यादाचे पालन करणे गरजेचे असूनचुकीच्या बाजूने वाहन चालवू नये. अपघातात जखमी लोकांना गोल्डन मिनिटात मदत केल्यास अनेकांना जीवदान मिळू शकते. लहान मुलांना मोटार सायकल चालविण्यास देवू नये. त्यांचाअपघात झाल्यास ज्यांच्या नावावर मोटार सायकल आहे, त्यांना त्रास होऊ शकतो. चार चाकी वाहन चालवताना नेहमी स्वसंरक्षणासाठी सिटबेल्ट वापरणे गरजेचे आहे. जे लोक या  नियमांचे पालन करतील, त्यांचा अपघाता पासून जरूर बचाव होवू शकतो. अशी माहिती देऊन महामार्गावर होणारे अपघात व त्या मध्ये होणारी जिवीतहानी टाळण्यासाठी वाहतूक नियमाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.