तुळजापूर- काक्रंबा केंद्रातील सावित्री जिजाऊ जन्मोत्सव 2025 बक्षीस वितरण सोहळ्याच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तुळजापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी समारोपाच्या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
यावेळी ते बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकविण्यासाठी अशा स्पर्धेचं आयोजन करणे गरजेचे आहे. आणि अशा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला पाहिजे.काक्रंबा केंद्राने एक आगळावेगळा उपक्रम घेतल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे गट विकास अधिकारी अमोल ताकभाते
तर प्रमुख पाहुणे म्हणून काक्रंबा गावचे सरपंच कालिदास खताळ, मंगरूळ बीटचे उपक्रमशील विस्तार अधिकारी मल्हारी माने, टाटा सामाजिक संस्थेचे गणेश चादरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर सोनवणे , उपाध्यक्ष मैना शिरसागर, काक्रंबा बीटचे विस्ताराधिकारी मल्लिनाथ काळे , भोसले साहेब ग्रामसेवक बारूळ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सोनाली कोरे ,प्रियंका क्षीरसागर
केंद्रीय मुख्याध्यापक उषा उंबरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीहरी लोखंडे यांनी केले.
प्रास्ताविका मध्ये बोलताना श्रीहरी लोखंडे म्हणाले की काक्रंबा केंद्रातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे ,संधी उपलब्ध करून दिली पाहिजे , त्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देणे गरजेचे असल्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील स्पर्धा दोन दिवस घेण्यात आलेल्या होत्या. यामध्ये एक ते चार प्राथमिक गट आणि पाच ते आठ उच्च प्राथमिक गट करण्यात आले होते. सुंदर हस्ताक्षर स्पर्धा ,निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,वैयक्तिक गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
काक्रंबा केंद्रातील 17 शाळेनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख श्रीहरी लोखंडे ,केंद्रीय मुख्याध्यापक उषा उंबरे, सहशिक्षक अमीन मुलानी, उमेश सुर्वे , जगन्नाथ वाघे, छगन जगदाळे, अशोक पाटील, सिद्धेश्वर थोरात, अशोक चव्हाण, दिपाली परदेशी ,नंदा मोरे ,स्वाती मोरे, अनिल दहीहांडे, विद्यासागर गायकवाड, संजीवनी सरवदे, दत्तात्रय केसकर, प्रीतम कुमार सोळंके यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश सुर्वे यांनी केले तर आभार खंडाळा शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण खडके यांनी मानले.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.