सामुदायिक राष्ट्रगीत व राज्य गीत कार्यक्रमांमध्ये श्री समर्थ कॉम्प्युटर तर्फे,तहसीलदार यांचा सत्कार, व राष्ट्रगीत राज्यगीत आणि भारताचे संविधान तहसील कार्यालयास भेट.


संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव

तुळजापूर येथे आयोजित सामुदायिक राष्ट्रगीत व राज्य गीत कार्यक्रम मध्ये MKCL अधिकृत प्रशिक्षण केंद्र श्री समर्थ कॉम्प्युटर्स, तुळजापूरच्या संचालिका यांच्यातर्फे मा. तहसीलदार अरविंद बोळंगे साहेब यांचा सत्कार करण्यात आला व त्याचप्रमाणे राष्ट्रगीत भारताच्या संविधान आणि राज्य गीत चे फ्लेक्स देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक यांचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे एमकेसीएल अधिकृत कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र श्री समर्थ कॉम्प्युटर्स च्या संचालिका अनुराधा नाईक यांच्यातर्फे आयोजकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सर्व पत्रकार,राजकीय, सामाजिक, आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर त्याचप्रमाणे तुळजापूर शहरातील सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.त्याचप्रमाणे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जवळपास तुळजापूर शहर आणि तुळजापूर तालुक्यातील 25 शाळा आणि कॉलेज यांनाही श्री समर्थ कॉम्प्युटर्स तुळजापूर तर्फे फ्लेक्स देण्यात आले.