“अनैतिक देह व्यापार करणा-या महिला विरुध्द गुन्हा दाखल”


संपादक रुपेश डोलारे धाराशिव

स्थानिक गुन्हे शाखा : पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या पथकाने जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 27.02.2025 रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, धाराशिव शहरातील शेकापुर रोड बालाजी नगर येथे एक महिला घरामध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद घरात 14.55 वा. सु. छापा टाकला असता घरामध्ये मध्ये एक महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत तिची विचारपुस केली असता रत्नमाला सतीश मदने, वय 46 वर्षे, रा. शेकापुर रोड बालाजी नगर धाराशिव हिचे सांगण्यावरुन त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होती व नमुद महिला त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहे असे समजले. यावरुन पथकाने नमुद महिला- रत्नमाला सतीश मदने, वय 46 वर्षे, रा. शेकापुर रोड बालाजी नगर धाराशिव हीचे ताब्यातुन रोख रक्कम 7,900 व निरोधची पाकीटे असा एकुण 7,970 ₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या ताब्यातुन त्या महिलेची सुटका करुन नमुद महिला नामे- रत्नमाला सतीश मदने, वय 46 वर्षे, रा. शेकापुर रोड बालाजी नगर धाराशिव हिचेविरुध्द गुरनं 92/2025 भा.न्या. सं. कलम- 143, 144, सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5,7 अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दि. 27.02.2025 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

            सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक- श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटके, अमोल मोरे, पोलीस हावलदार- विनोद जानराव, अमोल निंबाळकर, समाधान वाघमारे, शोभा बांगर, पोलीस नाईक अमंलदार- बबन जाधवर, नितीन जाधवर, चालक पोहेकॉ महेबुब अरब, विजय घुगे पोलीस अमंलदार-दहिहांडे, धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे सपोफौ /108 पुरके यांच्या पथकाने केली.