पोलीस अधीक्षक धाराशिव श्री संजय जाधव यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती षफकत आमना व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गौरीप्रसाद हिरेमठ यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस ठाणे परंडा प्रभारी श्री दिलीपकुमार पारेकर यांच्या सुचनेप्रमाणे व त्यांना मिळालेली गोपनीय माहिती एका इसमाने त्याचे कब्जात अवैधरित्या शस्त्र बाळगलेले असुन तो परंडा पोलीस ठाणे हददीत येणार असल्याबाबत माहितीनुसार लागलीच त्यांनी पोलीस ठाणे परंडा येथील सपोनि शंकर सुर्वे, पोलीस हवालदार/1303 नितिन गुंडाळे व पोलीस हवालदार/1290 विशाल खोसे व पोना/1280 मधुसुदन भोपेमहानुभव यांची एक टिम बनवुन गोपनीय बातमीच्या अनुशंगाने दिनांक 14.03.2025 रोजी 03.30 वा च्या सुमारास परंडा ते देवगाव जाणा-या रोडवर श्री. दिपक केरबा गरड यांच्या परंडा कात्राबाद रस्त्यालगत असलेल्या षेताजवळ इसम नामे 1.सचिन नवनाथ इतापे रा. लोणी, ता. परंडा, जि. धाराशिव, 2.तुशार भारत षिंदे, रा. लोणी, ता. परंडा, जि. धाराशिव, 3.वैभव गोरख कोडलिंगे, रा. षेंद्री, ता. बार्षी, जि. सोलापूर, 4.सुजित लक्ष्मण पवार रा. भोत्रा ता. परंडा, जि. धाराशिव व 5.चैतन्य पांडुरंग षेळके रा. भोत्रा, ता. परंडा, जि. धाराशिव असे परांडा शहरात दरोडा टाकण्याचे उददेषाने एकत्र येवुन दरोडयाचे तयारीनिशी विनापरवाना एक सिल्व्हर रंगाचे गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत राउंड, दोन धारदार कत्ती व एक विनानंबर हिरो होंडा कंपनीच्या फॅशन प्लस माॅडेलच्या मोटार सायकल असा एकुण 38500/रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला.
तसेच चैतन्य पांडुरंग शेळके रा. भोत्रा, ता. परंडा, जि. धाराषिव व सुजित लक्ष्मण पवार रा. भोत्रा, ता. परंडा, जि. धाराषिव यानंी मा. उपविभागीय दंडाधिकारी साो, उपविभाग भुम, धाराशिव यांचा हददपार प्रस्तावाचा भंग करून त्यांची अथवा गृह विभाग विषेश महाराष्ट्र शासन यांची कोणतीही पुर्व परवानगी न घेता मौजे भोत्रा, ता. परंडा, जि. धाराषिव मध्ये प्रवेश करुन वर नमुद आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन पोलीस हवालदार/1303 नितिन प्रकाषराव गुंडाळे यांचे फिर्यादी जबाब वरून गुरनं 77 /2025 कलम 310(4),310(5)भारतीय न्याय संहितासह कलम 3, 4, 25 शस्त्र अधिनियम सह कलम 56(अ)/142 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करून 1.सचिन नवनाथ इतापे रा. लोणी, ता. परंडा, जि. धाराशिव, 2.तुशार भारत षिंदे, रा. लोणी, ता. परंडा, जि. धाराषिव,3.सुजित लक्ष्मण पवार रा. भोत्रा ता. परंडा, जि. धाराशिव यांना अटक करून दिनांक 18/03/2025 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. व आरोपी वैभव गोरख कोडलिंगे, रा. षेंद्री, ता. बार्षी, जि. सोलापूर, व चैतन्य पांडुरंग षेळके रा. भोत्रा, ता. परंडा, जि. धाराशिव हे अंधाराचा फायदा घेवून फरार झाले आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस निरिक्षक परंडा श्री दिलीपकुमार पारेकर, सहा.पोलीस निरिक्षक श्री षंकर सुर्वे, पोलीस हवालदार/नितिन गुंडाळे, विषाल खोसे, मधुसुदन महानुभव, साधु षेवाळे, श्रीकांत भांगे व होमगार्ड दत्ता मेहेर, विजय रोडगे सहभागी झाले होते.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.