“खंडणी मागणाऱ्यावर, भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.”


संपादक रुपेश डोलारे धाराशिव

भुम पोलीस ठाणे :आरोपी नामे- अंकुश गायकवाड, श्रीराम गायकवाड यांनी दि. 01.03.2025 रोजी 18.00 वा. सु. भुम ते पार्डी रोडवरील पार्डी घाटाच्या खाली हिवरा शिवारातील पुलावर फिर्यादी नामे-विशाल अंकुश चौधरी, वय 21 वर्षे, रा. गोजवाडा ता. वाशी जि. धाराशिव हे व साक्षीदार यांनी दुध व्यवसायासाठी गायी घेवून जात असताना नमुद आरोपींनी फिर्यादी यांचे जनावरांच्या गाड्या आडवून त्यांचेकडे जनावरांच्या पावत्याची मागणी करुन जनावरांमागे 10,000 ₹ या प्रमाणे पैशाची मागणी करुन पैसे देण्यास नकार दिल्याने, धमकी देवून गाड्या पोलीस ठाणे येथे घेवून येण्यास सांगितले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विशाल चौधरी यांनी दि.02.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 308(3), 126(2),3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.