28 एप्रिल रोजी उमरगा ओम लॉन्स येथे शांतिदूत परिवाराच्यावतीने शांतिदूत सेवा रत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी शांतिदूत परिवाराचे सर्वेसर्वा IPS विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य सेवा नि. डॉ. विठ्ठलराव जाधव साहेब तसेच संस्थापक अध्यक्षा सौ.विद्याताई जाधव, मा. आमदार प्रवीण स्वामी सर, मा. शरणभैया पाटील संचालक विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरूम, सौ स्मिता गायकवाड सोलापूर अध्यक्ष रयत शांतिदूत परिवार महाराष्ट्र डॉ. बिराजदार तालुका आरोग्य अधिकारी, शांतिदूत परिवाराचे सर्व पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्यात मध्ये सामाजिक कार्यकर्त्या जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय सचिव तथा उमरगा येथील चव्हाण क्लिनिकच्या निसर्गोपचार तज्ञ डॉ. सौ. मंजुषाताई प्रेमनाथ चव्हाण यांना शांतिदूत सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.मंजुषाताई चव्हाण या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत या सोबतच गोरगरीब जनतेसाठी कधी मोफत तर कधी अत्यल्प दरात रोग्यांना सेवा देतात तसेच महिलांना आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शन,आर्थिक दृष्ट्या दुर्बल होत करू मुलींचे शिक्षणासाठी आर्थिक मदत तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध महिला मेळावे तसेच दर वर्षी हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करतात विधवा व गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभ्या असतात व प्रत्येकाला सहकार्य व मार्गदर्शन करून प्रेरणा त्या सातत्याने देतात.
सामाजिक क्षेत्रामध्ये ही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे त्यांना 2020 मध्ये पत्रकार भवन मुंबईतर्फे महाराष्ट्र दर्पण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्राप्त झाला तर दुसरा पुरस्कार 2021 मध्ये इंदापूर मराठा सेवा संघाच्या वतीने राज्यमंत्र्याच्या हस्ते शिवभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला तर 2022 मध्ये मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अशा अनेक पुरस्काराने त्या सन्मानित आहेत त्यांच्या या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन शांतिदूत परिवाराच्या वतीने सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्यामुळे डॉ. मंजुषा ताई चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे..
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.