तुळजापूर शहरातील आर्य चौक येथे प्रभु श्रीराम जन्मोत्सव उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा.

संपादक रुपेश डोलारे धाराशिव


जय भवानी तरुण मंडळ व जाणता राजा युवा मंच, आर्य चौक, श्री क्षेत्र तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभु श्रीराम जन्मोत्सव रविवार, दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता पारंपरिक पद्धतीने व अत्यंत भक्तिभावात साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमात प्रभू श्रीरामांचे जन्मपूजन, रामरक्षा पठण आणि सामूहिक आरती करण्यात आली. ५१ किलो गोड पेढ्यांचे वाटप करून आनंद द्विगुणित करण्यात आला. संपूर्ण परिसरात रामनामाचा जयघोष होत होता, आणि भक्तिभावाने भारलेले वातावरण अनुभवायला मिळाले.


मंडळाच्या सभासदांनि मनोगत व्यक्त करताना सांगितले कि श्री राम नवमी हि शहरातील प्रत्येक चौकात, मंडळात प्रत्येक वर्षी उत्साहात साजरी व्हावी त्यासाठी प्रयत्न करीत राहतील. 

कार्यक्रमस्थळी मान्यवर म्हणून श्री. अमोल कुतवळ, श्री. शाम पवार, श्री. सुदर्शन वाघमारे, श्री. राजाभाऊ चोपदार, श्री. कोरे सर, श्री. नागेश किवडे, श्री. प्रसाद प्रयाग, श्री. शुभम खोले, श्री.पुरंजन कोंडो, श्री. दुर्गेश वराडे, श्री. सोमा मस्के, श्री. ओंकार लसने, श्री. सागर मस्के, श्री. संकेत मस्के, श्री. सचिन बागल, श्री. शुभम दहिहांडे, श्री. अर्जुन परदेशी, श्री.आदित्य बुरांडे, श्री. संकेत मस्के, श्री. समर्थ शिवराज लोंढे आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. सतीश महामुनी व श्री. प्रदीप अमृतराज यांची उपस्थिती लाभली. त्यांनी श्रीरामाच्या आदर्श जीवनावर प्रकाश टाकत उपस्थितांना प्रेरणादायी विचार मांडले.