तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालय येथे, २९ मे रोजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांचे ठिय्या आंदोलन.



तुळजापूर प्रतिनिधी : तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर येथील लेखापाल यांच्या 2013 पासून आज पर्यंतच्या कामकाजाची चौकशी करून कारवाही होत नसल्यामुळे तसेच 47 जणांची भरती प्रक्रिया केली ज्यामध्ये 13 ते 15 पद वाढवण्यात आली असून संकेतस्थळावर कुठलीही माहिती न देता वाढवण्यात आली,

 असून वाढीव पदाची चौकशी करून संबंधितांवर कारवाही होत नसल्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष गणेश पाटील हे उद्या दिनांक 29 मे रोजी सकाळी 11 वाजता तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती गणेश पाटील जिल्हाध्यक्ष यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे .