स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणणेकामी रवाना होवून कळंब येथे आले असता पथकास गोपनीय बातमीदार यांचे मार्फत माहिती मिळाली की, दोन इसम चोरीच्या मोटारसायकल विकत आहेत. प्राप्त झालेल्या माहितीवरुन तात्काळ नमुद इसमाचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेवून चोरीच्या मोटारसायकल बाबत विचारणा केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवून विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या अन्य एका साक्षीदारासह चोरुन आणलेल्या मोटारसायकल त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या ताब्यात एकूण ०4 मोटारसायकल मिळून आल्या. धाराशिव जिल्हा गुन्हे अभिलेख तपासला असता नमुद मोटारसायकल या पोस्टे आनंदनगर, तुळजापूर, येरमाळा व मुरुड जिल्हा लातूर हददीतुन चोरीस गेल्या असल्याचे दिसून आले. नमुद दोन आरोपींना तसेच 01,55,000 रु किमतीच्या एकूण ०4 मोटार सायकल सह ताब्यात घेवून त्यांना पुढील कारवाईस्तव पोस्टे हजर करण्यात आले़ आहे. ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव 1)अर्जुन साहेबराव काळे वय 29 वर्ष रा. वाकडी पारधी पिढी ता. कळंब जि. धाराशिव 2) नितीन विश्वास शिंदे वय 25 वर्ष रा नांदूर ता केज जि बीड ह. मु. मांडवा ता वाशी जि धाराशिव असे असून त्याचेकडून एकुण ०4 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पोलीस त्याचे अन्य साथीदाराचा शोध घेत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री, विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार,पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, चापोका रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.