सिंदफळ जिल्हा परिषद गटासाठी ॲड. सुनीता महादेव कांबळे,( ढवळे) इच्छुक



सिंदफळ (ता. तुळजापूर): येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या तसेच स्थानिक समस्यांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या ॲड. सुनीता महादेव कांबळे यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत सिंदफळ गटातून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे.


या संदर्भात त्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हा नेते सचिन भैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षश्रेष्ठींना अधिकृत मागणी करणार आहेत. पक्षाच्या विचारसरणीवर आणि विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून त्यांनी ही भूमिका घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.


ॲड. कांबळे यांनी आजवर समाजातील वंचित घटक, महिलांच्या हक्कांसाठी तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. स्थानिक नागरिकांकडूनही त्यांच्या उमेदवारीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.


पक्षाचे नेते सचिन भैय्या पाटील यांनीही सांगितले की, "भाजपच्या माध्यमातून तळागाळापर्यंत विकास पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, आणि सुनीता ताई कांबळे यांसारख्या कार्यकर्त्यांचा सहभाग पक्षासाठी बळकटी देणारा ठरेल."




👉 स्थानिक पातळीवर महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आणि गावोगाव विकासाच्या वाटचालीला गती देण्यासाठी ही उमेदवारी महत्त्वाची ठरणार आहे