वेताळ नगरात काँग्रेसची ताकद दाखवणारी सभा; ओम दादांकडून अमर भैय्यांना,अक्षय कदम, आणि रेखाताई पांडागळे यांना प्रचंड पाठिंबा अक्षय भैय्या, रेखाताई आणि अमर भैय्या यांना विजयी करा — खासदार ओम दादांचे मतदारांना आवाहन. वेताळ नगरात उत्स्फूर्त सभा; काँग्रेस नेतृत्वाची सामूहिक गर्जना — ‘तिघांनाही बहुमताने निवडा


दिनाक,27 नोव्हेंबर 2025 रोजी वेताळ नगर, तुळजापूर येथे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अक्षय भैय्या कदम आणि रेखा ताई पांडागळे यांच्या प्रचारानिमित्त खासदार ओम दादा राजेनिंबाळकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या कदम पाटील तसेच नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अमर भैय्या मगर उपस्थित होते.


या सभेत मार्गदर्शनपर भाषणे झाली. धीरज भैय्या कदम म्हणाले की, संतोष भाऊ यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पद भूषवले असून त्यांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्यासाठी त्यांच्या पुतण्याला—अक्षय भैय्याला—प्रेमापोटी समर्थन देत प्रचंड बहुमताने विजयी करा.


नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर भैय्या मगर यांनीदेखील मतदारांना आवाहन करताना म्हटले की, “अक्षय भैय्या, रेखा ताई तसेच मला प्रचंड मतांनी निवडून द्या.”


खासदार ओम दादा राजेनिंबाळकर यांनी अक्षय भैय्या यांच्या कामाचे कौतुक करत म्हणाले की, “तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज लागली किंवा कोणत्याही कामात अडचण आली, तर मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही.”


यावेळी खासदारांनी अक्षय भैय्या कदम, रेखा ताई पांडागळे तसेच नगराध्यक्ष उमेदवार अमर भैय्या मगर यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले. यावेळी अमर मगर .धिरज पाटिल. भाऊ भांजी ,अमोल कुतवळ, शाम पवार . गोरख पवार दिलीप धुमाळ.सतोष इंगळे. आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.