प्रभाग ६ : सौ. सरोजा नरेश अमृतराव यांच्या प्रचाराला महिलांचा जबरदस्त उत्साह


तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केलेल्या सौ. सरोजा नरेश अमृतराव यांच्या प्रचाराला महिलांकडून मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असून परिसरात त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे.


सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतलेल्या सौ. सरोजा अमृतराव यांनी अष्टविनायक मोफत दर्शन यात्रा, किराणा किट वितरण, दीपावली किट वाटप अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांची निस्वार्थ सेवा केली आहे. त्यांच्या या कामांची दखल महिलांसह सर्वच स्तरांतील मतदारांकडून घेतली जात असून, “सेवा हाच धर्म” या भावनेतून त्यांनी घडवलेल्या कार्याची छाप ठळकपणे उमटली आहे.


डोअर-टू-डोअर जनसंपर्कात सौ. अमृतराव यांना मिळणारी महिलांची उत्स्फूर्त गर्दी आणि पाठिंबा पाहता प्रभाग ६ मध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि आत्मीयता अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.


प्रभागाचा सर्वांगीण विकास, महिलांसाठी सुरक्षित व सक्षम वातावरण, तसेच मूलभूत सुविधा मजबूत करण्याचे ठोस व्हिजन घेऊन सौ. सरोजा अमृतराव निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

त्यांच्या या सकारात्मक कामांच्या जोरावर विजय त्यांच्या दिशेने झुकत असल्याचे संकेत मतदारांमध्ये स्पष्टपणे उमटत आहेत.