काटी जिल्हा परिषद गटातून, OBC महिला प्रवर्गातून सौ. पूनम कोडगिरे यांची शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी विकास आणि समाजकारणाच्या बळावर कोडगिरे निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी




वडगांव काटी (ता. तुळजापूर) — काटी जिल्हा परिषद गटातील OBC महिला प्रवर्गातून वडगांव काटी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. पूनम गौरीशंकर कोडगिरे यांनी शिवसेना (उबाठा गट) कडे उमेदवारीची मागणी केली आहे.

ही मागणी युवा नेते ऋषिकेश (भैय्या) मगर यांच्या माध्यमातून करण्यात आली असून, सौ. कोडगिरे यांनी यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.

ग्रामपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामांमुळे सौ. कोडगिरे यांनी स्वतःची ठसठशीत ओळख निर्माण केली आहे.

स्थानिक कार्यकर्ते, महिला वर्ग व ग्रामस्थांकडून त्यांच्या उमेदवारीस मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आगामी निवडणुकीत त्यांना मजबूत जनाधार मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.