लोकमंगल फाउंडेशनतर्फे 10 मे रोजी धाराशिव येथे सामुदायिक विवाह सोहळा 20 वर्षांची परंपरा; 3203 जोडपी विवाहबद्ध


तुळजापूर प्रतिनिधी :
लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने 47 वा सामुदायिक विवाह सोहळा दिनांक 10 मे 2026 रोजी धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी वधू-वरांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी केले आहे.
लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा 2006 पासून सुरू झाली असून समाजात हा उपक्रम एक आदर्श म्हणून ओळखला जात आहे. या उपक्रमाला यंदा 21 वे वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या 20 वर्षांत 46 सामुदायिक विवाह सोहळे यशस्वीपणे पार पडले आहेत.
या सर्व सोहळ्यांमधून आतापर्यंत 3203 जोडपी विवाहबंधनात अडकली आहेत. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या उपक्रमाचा मोठा आधार मिळाला आहे. सामुदायिक विवाहामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसत असून साधेपणाने विवाह करण्याची प्रेरणा मिळत आहे.
या उपक्रमाला विविध समाजघटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. धर्मनिरपेक्षतेचा आदर्श जपत विविध धर्मांच्या जोडप्यांनी या सोहळ्यात सहभागी होत विवाह केला आहे. गेल्या 20 वर्षांत हिंदू धर्मातील 2490, बौद्ध समाजातील 681, मुस्लिम समाजातील 21, ख्रिश्चन धर्मातील 4, तर जैन समाजातील 7 जोडपी या सामुदायिक विवाह सोहळ्यातून विवाहबद्ध झाली आहेत.
सध्या विवाह सोहळ्यासाठी नोंदणी सुरू असून अंतिम नोंदणीची मुदत 30 एप्रिल 2026 आहे. जास्तीत जास्त इच्छुकांनी या विवाह सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी संपर्क :
मा. श्री. रोहन (दादा) देशमुख यांचे संपर्क कार्यालय,
जुना बस स्टँड समोर, ICICI बँकेखाली, हंगरगेकर कॉम्प्लेक्स, तुळजापूर.
संपर्क :
विनोद देवकर – 9923800256
पत्ता :
लोकमंगल मल्टीस्टेट, पोलिस लाईन समोर,
तीर्थकर कॉम्प्लेक्स, आनंद नगर, धाराशिव.