तुळजापूर (प्रतिनिधी) : पवित्र रमजान महिन्यानिमित्त तुळजापूर शहरातील जामा मस्जिद परिसरात शिवसेना पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. या इफ्तार पार्टीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत उत्साहात उपवास सोडला.
सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून या निमित्ताने शुक्रवार रोजी जामा मस्जिद येथे इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुस्लिम बांधवांसाठी विविध प्रकारची फळे, खजूर तसेच खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मुस्लिम बांधवांसोबत शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकत्र येत उपवास सोडला. तसेच आगामी रमजान ईदच्या शुभेच्छा देत समाजात बंधुभाव व सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यात आले. या उपक्रमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश समाजाला देण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव, शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, उपशहर प्रमुख रमेश चिवचिवे, शहर संघटक नितीन मस्के, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते, संजय लोंढे, बाळू भय्ये यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचे आभार मानण्यात आले. तसेच अशा उपक्रमांमुळे समाजात बंधुभाव आणि ऐक्य अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.