काक्रंबा येथे ट्रॅक्टरच्या धडकेत 8 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

 

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे झालेल्या दुर्दैवी रस्ता अपघातात 8 वर्षीय श्रेया गोकुळ माळी हिचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेया गोकुळ माळी (वय 8 वर्षे, रा. बामणी, ता. जि. धाराशिव) ही दि. 10 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 7.45 वाजता काक्रंबा येथील फुलसागर यांच्या घरासमोरील रस्त्यावर खेळत होती. त्यावेळी ट्रॅक्टर (क्र. MH-25-AS-8642) चालक बापू भारत बेडगे (रा. काक्रंबा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी ट्रॅक्टर भरधाव व निष्काळजीपणे चालवून श्रेयाला धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी गणपती बळी माळी (वय 55 वर्षे, रा. बामणी, ता. जि. धाराशिव) यांनी दि. 11 जुलै 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 106, 125(ब), 281 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.