लव्ह जिहाद प्रकरणी मदत केल्याबद्दल तुळजापूर चे पोलिस निरीक्षक श्री आण्णासाहेब मांजरे साहेब यांचा संत,महंत, हिंदुत्ववादी संघटना कडून सत्कार



     एका पीडित हिंदू मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी तत्परतेने मदत केल्याबद्दल पोलीस निरीक्षक (PI) अण्णासाहेब मांजरे यांचा तुळजापूर मधील हिंदूं आणि हिंदुत्ववादी संघटना च्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. 
    संघटना च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन मा.श्री.मांजरे साहेब यांना भागवत गीता, श्रीफळ शाल देऊन त्यांचा गौरव केला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका पीडित कुटुंबाने या प्रकरणा संदर्भात पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली होती. यावेळी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने कायदेशीर पावले उचलली आणि पीडितेच्या कुटुंबाला धीर दिला. त्यांच्या या तत्पर आणि संवेदनशील कामगिरीमुळे पीडित हिंदू कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
 'अशा अधिकाऱ्यांमुळेच कायद्यावरचा विश्वास दृढ होतो'
सत्कार प्रसंगी बोलताना हिंदू संघटनाच्या समन्वयकांनी सांगितले की: "समाजात अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. PI अण्णासाहेब मांजरे यांनी दाखवलेले कर्तव्यदक्षता आणि तत्परता कौतुकास्पद आहे. अशा पोलीस अधिकाऱ्यांमुळेच पीडित कुटुंबांना न्याय मिळतो आणि समाजाचा कायद्यावरील विश्वास अधिक दृढ होतो."
पोलिसांचे आवाहन
सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी समितीच्या सदस्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, "कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षिततेची भावना देणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. नागरिकांनी किंवा कोणत्याही कुटुंबाने अशा प्रकारच्या दबावाला किंवा फसवणुकीला बळी न पडता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा."


या सत्कार सोहळ्याच्या वेळी महंत मावजी नाथ महाराज, महंत ईच्छागिरी महाराज, महंत व्यंकटारण्य व जगदीश पलंगे, शाहजी जगदाळे, सुदर्शन डोंगरे, सुरज लोंढे इतर पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.