भूम | दि. १७ सप्टेंबर २०२६. रुपेश डोलारे धाराशिव भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करताना पाथरूड येथील हॉटेल सह्याद्री येथे गांजा व दारूसाठा जप्त करण्यात आला. दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी २४१ ग्रॅम गांजा तसेच देशी-विदेशी दारू असा एकूण ३५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाथरूड ते पाटसांगवी रोडवरील हॉटेल सह्याद्री येथे विनापरवाना गांजा बाळगून तसेच देशी-विदेशी दारूचा साठा करून विक्री करीत असल्याच्या कारवाईत अरुण गोवर्धन जाधव, वय २७ वर्षे, रा. राळेसांगवी, ता. भूम, जि. धाराशिव याच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये आरोपीच्या ताब्यातून हिरवट-काळसर रंगाचा २४१ ग्रॅम गांजा, अंदाजे किंमत १२ हजार ५० रुपये, जप्त करण्यात आला. तसेच देशी दारूच्या १८० मिली क्षमतेच्या एकूण १३६ बाटल्या आणि ट्युबॉर्ग स्ट्राँग बिअरच्या ६५० मिली क्षमतेच्या ४ बाटल्या, असा एकूण २३ हजार ७५० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाणे भूम येथे गु.र.नं. ४८७/२०२६, कलम ६५(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम सह कलम ८(क), २०(ब) एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती रितू खोखर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी भूम श्री. अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते, सपोनि खांडे तसेच पोलीस अंमलदार HC १५४७ कवडे, PC ५०३ कवडे, PC १६१४ जाधव, PC ७१६ चेडे, PC १०४८ नाईकवाडी, HC ५६४ किवंडे व HC ५३७ मोटे यांनी केली. AR न्यूज मराठी | धाराशिव
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.