तुळजापूरचा राजा श्रीमंत राजयोगी पावणारा गणपतीची सकाळची पूजा उत्साहात संपन्न

तुळजापूर | दि. २१ सप्टेंबर २०२६, सोमवार
तुळजापूरचा राजा श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती यांच्या सकाळच्या पूजेचा धार्मिक सोहळा आज दि. २१ सप्टेंबर रोजी राजा कंपनी तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात पार पडला.

आजच्या सकाळच्या श्रींच्या पूजेचे यजमान म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक तसेच जनहित संघटनेचे मान्यवर यांच्या शुभहस्ते श्रींची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.
यावेळी राजा कंपनी तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात पूजा व आरती संपन्न झाली.


या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतल्याबद्दल तसेच पूजेला यजमान म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल राजा कंपनी तरुण मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले