आठवडी बाजारातून दोन मोबाईल चोरीला; तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल


तुळजापूर, दि. ११ सप्टेंबर २०२६ :
तुळजापूर शहरातील आठवडी बाजारातून दोन नागरिकांचे तब्बल ७० हजार रुपये किमतीचे मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची घटना समोर आली आहे.
अमीर इब्राहिम शेख (वय ३७, रा. आपसिंगा, ता. तुळजापूर) यांचा ५० हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, तसेच हेमंत शामराव कांबळे (वय ७०, रा. देऊळ गल्ली, तुळजापूर) यांचा २० हजार रुपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल चोरीला गेला.
दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील आठवडी बाजारात ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने दोन्ही मोबाईल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अमीर शेख यांनी दि. १० सप्टेंबर रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.