उमरगा | दि. १ ऑक्टोबर २०२६ : उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार शिवारात अनैतिक संबंधाच्या कारणावरून ३८ वर्षीय व्यक्तीची फरशी व दगडाने मारहाण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तानाजी शिवाजी गायकवाड, वय ३८ वर्षे, रा. चिंचोली भुयार, ता. उमरगा, जि. धाराशिव यांच्यावर आरोपी निशांत अंकुश पांढरे आणि आशिष आण्णाराव गुरुळे, दोघेही रा. काटेवाडी, ता. उमरगा, जि. धाराशिव यांनी हल्ला केला. दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत चिंचोली भुयार शिवारातील सर्वे नं. ३९ मधील शेतात ही घटना घडल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. मयताची पत्नी आणि आरोपी निशांत पांढरे यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फरशी व दगडाने मारहाण केल्याने तानाजी गायकवाड यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताची आई सोजरबाई शिवाजी गायकवाड, वय ७५ वर्षे, रा. चिंचोली भुयार यांनी दि. ३० सप्टेंबर रोजी मुरूम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास मुरूम पोलीस करीत आहेत. AR न्यूज मराठी – धाराशिव संपादक रुपेश डोलारे
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.