उमरगा बसस्थानक परिसरात कल्याण मटका जुगारावर पोलिसांचा छापा! मदनसुरी येथील ५१ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; जुगाराचे साहित्य, मोबाईल आणि १,०५० रुपयांची रोकड जप्त

 


उमरगा | प्रतिनिधी
उमरगा शहरातील बसस्थानक परिसरात कल्याण मटका जुगाराविरोधात उमरगा पोलिसांनी कारवाई केली. शुक्रवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.२० वाजण्याच्या सुमारास हॉटेल प्रभातच्या पाठीमागील मोकळ्या जागेत पोलिसांनी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान त्रिमूर्ती रघुनाथ शिंदे (वय ५१, रा. मदनसुरी, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्याकडे कल्याण मटका जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन आणि १,०५० रुपये रोख रक्कम आढळून आली.
पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली असून, संबंधित व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगारविरोधी कारवाई करण्यात आल्याने अवैध जुगाराच्या प्रकारांवर पोलिसांचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
AR न्यूज मराठी | धाराशिव