नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील नंदगाव शिवारात अज्ञात व्यक्तीने शेतातील सोयाबीन पिकाला आग लावल्याची घटना घडली. या आगीत शेतकऱ्याचे सुमारे ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नंदगाव येथील शेतकरी दत्तात्रय सोमन्ना येणगुरे (वय ५८) यांच्या नंदगाव शिवारातील गट क्रमांक ५६१ व ५२४ मधील २४ एकर क्षेत्रातील सोयाबीन पिकाला दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीत सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अंदाजे ११ लाख रुपयांचा फटका शेतकऱ्याला बसला आहे. याप्रकरणी दत्तात्रय येणगुरे यांनी ३१ ऑक्टोबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२६ (एफ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.